मालवण : रेवतळे येथील नदीत मोठ्या प्रमाणात गाळ आणि झाडे झूडपे वाढली होती. गणपती विसर्जन करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक मंदार केणी आणि उमेश मांजरेकर यांनी स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने नदीतील गाळ काढला. तसेच वाढलेली झाडे तोडत जाण्यासाठी मार्ग मोकळा केला.
रेवतळे येथील नदीत रेवतळे येथील घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. मात्र, या नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे मूर्ती विसर्जन होतं नव्हते. शिवाय त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढली होती. अखेर माजी नगरसेवक मंदार केणी, उमेश मांजरेकर यांनी आज जेसीबीच्या साहाय्याने तेथील झाडे तोडून जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. शिवाय विसर्जणासाठी आवश्यक असणारा गाळ काढून खोली केली. त्यामुळे आता गणेश मूर्तीचे पूर्णतः विसर्जन होणार आहे. नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.