
सिंधुदुर्ग : न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेची इ.9 मध्ये शिकणारी कु. मनस्या निलेश फाले हिने अमरावती येथे झालेल्या राज्य स्तरीय ऑल इंडिया स्थल सैनिक कॅम्प सर्व्हिस शूटिंग (फायरींग) स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून तिने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. या अगोदर तिची निवड 58 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. सिंधुदूर्ग येथे सुरू असलेल्याC A T C- 314 कॅम्प मध्ये कोल्हापूर ग्रुप अंतर्गत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातून I G C (इंटर ग्रुप स्पोर्ट्स) सर्व्हिस शूटिंग साठी तिची 130 विद्यार्थ्यांमधून अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प सर्व्हिस शूटिंग (फायरींग) साठी निवड झाली होती.
मनस्या ही खेळा बरोबरच अभ्यासात सुद्धा हुशार आहे. तिने इ.8 वी मध्ये NNMS ची शिष्यवृत्ती मिळविली आहे. तिला स्थल सैनिक कॅम्प सर्व्हिस शूटिंग स्पर्धेसाठी या प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर, एन. सी. सी. ऑफिसर आर्या भोगले, एम. जी.लाड, ए. व्ही. पोफळे यांचे सुयोग्य मार्गदर्शन लाभले आहे. तसेच तिच्या या सुवर्णमय वाटचालीत तिचे आई वडील व या प्रशालेच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. मनस्या ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत असून सुध्दा तिचा आत्मविश्वास,प्रचंड मेहनत करण्याची आवड व महत्वाकांक्षा या जोरावर एवढ्या लहान वयात ती भारतीय सैन्यात अधिकारी पदावर काम करण्याचे स्वप्न पाहत असून त्या दृष्टीने तिचे यशस्वी प्रयत्न चालू आहेत.तिच्या या यशाचे कौतुक फोंडघाट मधून करण्यात येत आहे