वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील मानसीश्वर जत्रौत्सवानिमित्त नवाबाग पूर्ण प्राथमिक शाळेच्या स्काऊट गाईड आणि कब बुलबुल पथकाने नारळ, केळी, फुले आणि निशाण यांचे दुकान मांडून ख-या कमाईचा अनुभव घेतला.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी श्रमप्रतिष्ठा मूल्य रूजावे, व्यावसायिक कौशल्य निर्माण करणे तसेच कष्टाचे महत्त्व कळावे व त्यातून अर्थार्जन कसे करावे याची माहिती मिळावी हा प्रमुख हेतू होता. या उपक्रमासाठी कब बुलबुल आणि स्काऊट गाईड पथकातील चिन्मयी मोर्जे, गाथा कोळंबकर, तनिश गिरप, ओमकार केळुसकर, रामकृष्ण कुबल आणि सर्व कब बुलबुल पथक सहभागी झाले होते.
या मुलांना माजी शिक्षण सभापती दादा कुबल, व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा केळुसकर, उपाध्यक्ष कोळंबकर, तांडेल, केळुसकर, मुख्याध्यापक संतोष बोडके, शिक्षक ललिता जाधव, मारूती गुडुळकर, रेडकर, रामा पोळजी व प्राजक्ता आपटे यांचे सहकार्य लाभले.