महावितरणमुळे मुकली मोदींची 'मन की बात'

सेंच्युरी एपिसोडदरम्यान 'लाईट' आऊट
Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2023 12:39 PM
views 198  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज (30 एप्रिल) प्रसारित झाला. हा 100 वा भाग आज सकाळी 11 वाजता प्रसारित झाला. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली होती. हा सोहळा शहरात मोठ्या दिमाखात होत असतानाच महावितरणमुळं यात व्यत्यय आला. बराचवेळ तालुक्यातील काही भागासह शहरातील काही भागात बत्ती गुल झाली होती. काही काळ लाईट नसल्यानं ग्रामीण भागासह शहरी भागात मनकी बात पूर्णतः ऐकता आली नाही. भाजप कार्यकर्त्यांसह देशभरातील लोक आवर्जून मोदींची मन की बात ऐकतात. परंतु, सावंतवाडी लाईट आऊट झाल्यानं मोदींच्या १०० नंबरी मन की बातला मुकाव लागलं.