
सिंधुदुर्गनगरी : मातेचे दूध हा बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहार असतो , स्तनपान हा बाळाचा हक्क आहे. हे सर्व स्तनदा मातांना पटू लागले आहे. परंतु सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांना मात्र बाळाला स्तनपान करण्यासाठी अडचणीचे ठरते. कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकासह जिल्ह्यातल्या इतर स्थानकांवर सुद्धा स्तनदा मातांना स्तनपान करण्यासाठी कोणताही स्वतंत्र कक्ष उपलब्ध नाही.
कणकवली रेल्वे स्थानकावर स्तनपान करण्यासाठी ममता कक्षाची उभारणी करण्याचा निश्चय जिल्ह्याचे पालकत्व मनोभावे स्वीकारलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांनी केला . पत्रकार विजय गांवकर यांनी ममता कक्षा बाबतची कमतरता पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या क्षणाला त्यांनी कणकवली रेल्वे स्थानकावर ममता कक्ष उभारणीचा संकल्प केला. सादर सेवा हेच ध्येय असलेल्या कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांनी त्यास त्वरित परवानगी देऊन जागा आणि वीज उपलब्ध करून दिली .कणकवली रेल्वे स्थानकाच्या सामान्य विश्रांती कक्षात सुसज्ज अशा ममता कक्षाची उभारणी नामदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून करण्यात आली आहे . या ममता कक्षाचे उद्घाटन शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता होत आहे. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे. समाज हिताच्या कामासाठी प्रत्येक घटक आपले योगदान देत असतो. या ममता कक्षासाठी सुंदर फर्निचरचे रमेशकुमार मालवीय यांनी सुसज्ज कॉट उपलब्ध करून दिली आहे.