शिरोडा येथे ३१ मार्च रोजी "मालवणी साहित्य संमेलन"

साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या मासिक कार्यक्रमा निमित्त रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने आयोजन
Edited by:
Published on: March 25, 2025 14:21 PM
views 138  views

वेंगुर्ले : साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग ५३ व्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने सोमवार, दि.३१ मार्च २०२५ रोजी दुपारी ३.३० ते रात्री ८.०० या कालावधीत "मालवणी साहित्य संमेलना"चे आयोजन केले आहे.

शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या कै. मच्छिंद्र कांबळी सभागृहात होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मालवणी बोलीभाषेचे अभ्यासक श्री. सतीश लळीत हे असतील. या संमेलना मध्ये दुपारी ३.३० ते ४.०० : नोंदणी व चहापान, दुपारी ४.०० ते ५.०० या वेळेत संमेलनाचे उद्घाटन, संध्या. ५.०० ते ६.०० या वेळेत मालवणी साहित्यात काय असावे, काय नसावे? या विषयावर परिसंवाद असणार असून यामध्ये श्री. भाऊसाहेब गोसावी (अध्यक्ष) व सौ. कल्पना मळये, सौ. तनुजा तांबे सहभागी होणार आहेत. यानंतर अल्पोपाहार असणार आहे.

तर संध्या. ६.१५ ते ६.३० कै. जयवंत दळवी यांचा मालवणीनामा हा कार्यक्रम, संध्या. ६.३० ते ७.३० : कविसंमेलन यामध्ये अध्यक्षा डॉ. सई लळीत सहभागी होणार आहेत. आणि त्यानंतर संमेलनाचा समारोप असणार आहे. मालवणी भाषेचे प्रेमी या नात्यान तुमी या संमेलनाक जरूर येवचा, असो आग्रव आमचो आसा. संमेलनाच्या अधिक माहितीसाठी  ९४०३०८८८०२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क  साधावा असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्टा, आजगाव चे समन्वयक विनय सौदागर आणि र.ग. खटखटे ग्रंथालय, शिरोडा चे कार्यवाह सचिन गावडे यांनी केले आहे.