
कुडाळ : तेंडोली - आदोसेवाडी येथील अंजली राऊळ यांनी आयुष्यातील इतक्या महत्त्वाच्या दिवशी, म्हणजे लग्नाच्या दिवशीही मतदानाला प्राधान्य दिलं, हे समाजासमोर एक आदर्श उदाहरण आहे. 'आधी मतदान, मग लग्न' हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
लग्नाची लगबग, नटण्या-थटण्याची गडबड आणि पाहुण्यांची ये-जा असतानाही त्यांनी वेळ काढून केंद्र २७० वर आपला हक्क बजावला. त्यांच्या या निर्णयामुळे इतर तरुणांना आणि मतदारांना मतदानाचे महत्त्व समजण्यास मदत होईल. सहभागी होणे, हे एका सजग नागरिकाचे लक्षण आहे. अंजली राऊळ यांच्या या जबाबदार निर्णयाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असणारच. त्यांना त्यांच्या पुढील वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!










