मालवण तालुक्याचा निकाल ९९.६३ टक्के

Edited by:
Published on: May 05, 2025 19:19 PM
views 73  views

मालवण : फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात मालवण तालुक्याचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. परीक्षेत कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा सोहम लाड ९४.६७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला आहे. याच प्रशालेचा हर्षवर्धन पाटील हा ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी निकिता ताम्हाणेकर ही ९१ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. 

बारावी परीक्षेत येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा निकाल ९५.३८ टक्के लागला आहे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे. वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आर्ट्स आचराचा निकाल शंभर टक्के लागला आहे. भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सौ. इ. द. वर्दम कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कै. सौ. जयश्री वामन प्रभू आर्ट्स आणि कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय काळसेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा व्होकेशनल शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. आर. पी. बागवे हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मसुरेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

महाविद्यालय निहाय निकाल असा - टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय कला - काजल लुडबे (८१.३३ टक्के), तुलसी सकपाळ (७७.८३ टक्के), तन्वी पराडकर (७७ टक्के), रीना बुटे (७४.५० टक्के), तनया परब (७०.८३ टक्के), वाणिज्य - यशश्री पवार (८८ टक्के), युक्ता सावंत (८६ टक्के), जान्हवी आंबेरकर (८४.८३ टक्के), शुभम गावडे (८४.८३ टक्के), ऐश्वर्या पराडकर (८४.६७ टक्के), विज्ञान - धनश्री शेटवे (८७ टक्के), वैभवी मेस्त्री (८७ टक्के), हितेश मालंडकर (८३.५० टक्के), अथर्व कदम (८०.१७ टक्के), प्रणव चव्हाण (७८.३३ टक्के), मॅकनील फर्नांडिस (७८ टक्के), व्होकेशनल - दर्शना खरवते (६८.१७ टक्के), नरहरी कोळंबकर (६२.८३ टक्के), ज्योती सादये (६० टक्के), पीयूष मालाडकर (५९.१७ टक्के), तन्वी चिंदरकर (५७.३३ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुदेश मयेकर, सचिव विजय कामत, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य - सिद्धी परब (८५.१७ टक्के), कला - कोमल दहीतुले (७१ टक्के), जान्हवी माळी (६५.३३ टक्के), युगाली घोगळे (५५.३३ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सुनील नाईक, विजयश्री देसाई, साबाजी गावडे, अन्य संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अनिल फणसेकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण वाणिज्य - यश सावंत (७६.१७ टक्के), सोहम कासले (७२.८३ टक्के), सायली चव्हाण (७१.८३ टक्के), कला - आविश शेमडकर (३१० गुण), सिद्धी काजरेकर (२८३ गुण), प्रियांका मोडक (२६५ गुण) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, गोपीनाथ पालव, सर्व संचालक, प्राचार्य श्री. कुंभार, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

स्व. सौ. जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय काळसे वाणिज्य - मैथिली प्रभू (८३.३३ टक्के), प्रणिता खोत (७७.८३ टक्के), नविता माडये (७६.१७ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. 

एम. जी. बागवे भरतगड उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी - चैताली गुरव (५१.१७ टक्के), चिन्मयी गुरव (५०.३३ टक्के), इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी - कल्पेश माळकर (७० टक्के), एकनाथ परब (६९.८३ टक्के), संकेत चव्हाण (६३.८३ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. दीपक परब, प्रसाद बागवे, स्थानिक समिती अध्यक्ष राजन परब, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, मुख्याध्यापिका अर्चना कोदे, महेश बागवे, संस्था सभासद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा - विज्ञान - दीक्षा ठोंबरे (८४.६७ टक्के), रोहिणी परुळेकर (८४.५० टक्के), पूर्वा परुळेकर (७८.३३ टक्के), युतिका पालव (७८.३३ टक्के), कृष्णा देसाई (७८.३३ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सुनील नाईक, विजयश्री देसाई, साबाजी गावडे, संचालक शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अनिल फणसेकर, मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य - सानिका नरे (७७.७६ टक्के), आर्या किडये (७५.३३ टक्के), रिया सावंत (७१.५० टक्के), कला - वायदा खान (७९.५० टक्के), भार्गव खरवते (७२ टक्के), तन्वी दुखंडे (६४.६७ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, चंद्रशेखर कुशे, शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण अन्य संस्था पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. ए. ठाकूर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.