
- श्रीगणेश गावकर, सुधीर पडेलकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
- प्रशांत हिंदळेकर यांना 'बेस्ट स्टोरी अवॉर्ड'
- डॉ. ज्योती तोरसकर यांचा मालवण रत्न तर निलेश गवंडी यांना कला रत्न पुरस्कार
मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार 4 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल सभागृह येथे पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम यांनी दिली आहे.
मालवण पत्रकार समितीच्या वतीने वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात श्री. श्रीगणेश गांवकर (स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार), सुधीर पडेलकर (स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार) प्रशांत हिंदळेकर (बेस्ट स्टोरी अवॉर्ड, मालवण पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत) डॉ. ज्योती रविकिरण तोरसकर (मालवण रत्न पुरस्कार) श्री निलेश गवंडी (कला रत्न पुरस्कार) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे.
पत्रकार समिती सदस्यांसाठी गणेश सजावट स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली होती. यातील विजेते नितीन गावडे (प्रथम क्रमांक), भूषण मेतर (द्वितीय), प्रफुल्ल देसाई (तृतीय), केशव भोगले (उत्तेजनार्थ प्रथम), मनोज चव्हाण उत्तेजनार्थ द्वितीय), अर्जुन बापर्डेकर (उत्तेजनार्थ प्रथम) यांचा सन्मान होणार आहे.
पत्रकार समितीतील काही सदस्य तसेच काही सदस्य कुटुंबियांनी गतवर्षी उल्लेखनीय यश प्राप्त करून सन्मान प्राप्त केले. यात महेश सरनाईक, संतोष गावडे, शुभांगी खोत, प्राजक्ता पेडणेकर यांचा समावेश असून त्यांचा विशेष सत्कार यावेळी होणार आहे.
सत्कार सोहळा कार्यक्रम पूर्वी सकाळी 9:30 ते 10:30 या वेळेत परिसरातील प्रशालेतील मुलांचे ग्रुप डान्स तसेच दयानंद पेडणेकर यांचे कराओके गायन आदी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष डॉ. दीपक (मुळीक) परब, मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, यासह मालवण तालुका पत्रकार समितीचे पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.











