12 th RESULT | मालवणचा निकाल 98.60 टक्के

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 25, 2023 21:46 PM
views 90  views

मालवण : सन 2022-23 या वर्षाचा बारावी परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात झाला. यात येथील अ. शि. देसाई टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेचा विद्यार्थी श्याम पटेल हा 93.83 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम, भूमिका यादव 92.67 टक्के गुण मिळवून द्वीतीय


तर स्व. सौ. जयश्री वामन प्रभू कला, वाणिज्य कनिष्ठ  काळसेची वाणिज्य शाखेची समीक्षा माडये ही 90.33 टक्के गुण मिळवून तृतीय आली. मालवण तालुक्याचा एकूण 98.60 टक्के निकाल लागला. 


महाविद्यालयनिहाय निकाल असा- काळसे कनिष्ठ महाविद्यालयातून 35 विद्यार्थी परिक्षेस बसले सर्व उत्तीर्ण होऊन 100 टक्के निकाल लागला आहे. यात वाणिज्य शाखा- लक्ष्मी कोचरेकर 86.33 टक्के, ईशा खोत 85.67 टक्के, कला- वैशाली परब 85.83 टक्के, सुजल घाडी 80.67 टक्के, रिद्धी सावंत 78.17 टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमंत परब, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय- विज्ञान- मिलिंद मुरवणे 89.33 टक्के, वाणिज्य- निमिषा परब 88.83 टक्के, तनिषा मालवणकर 86.83 टक्के, योगिता तांडेल 85 टक्के, कला- गरिमा काजरेकर 80.67 टक्के, गायत्री सरमळकर 79.33 टक्के, वेदिका साटम 71.67 टक्के, पूजा चव्हाण 71.67 टक्के, किमानकौशल्य- फिरदोस सय्यद 78 टक्के, स्नेहा वायंगणकर 73 टक्के, सिमरन लुद्रीक 71.67 टक्के. महाविद्यालयाचा निकाल 98.29 टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शरद परूळेकर, सचिव विजय कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर सामंत, मुख्याध्यापक दत्तप्रसाद खानोलकर, संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे. भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. कला- प्रगती भोगले 76 टक्के, दिगंबर सातोसकर 72 टक्के, साक्षी पवार 64.83 टक्के, वाणिज्य- अमोल घाडी 85.33 टक्के, रिया गिरकर 84.50 टक्के, सौरभ चव्हाण 83.67 टक्के, विज्ञान- श्रावणी गावकर 70.50 टक्के, कोमल पालव 61.33 टक्के, प्रेरणा चव्हाण 59.33 टक्के, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक वामन खोत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे. न्यू इंग्लिश स्कूल आचरा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य, कला शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. वाणिज्य- प्रणिता आईर 89.50 टक्के, दीक्षिता पाताडे 86.83 टक्के, दर्शना परब 86.67 टक्के, कला- ज्योती जाधव 81.83 टक्के, तेजल बागडे 76.50 टक्के, अर्पिता हडकर 70.67 टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष नीलिमा सावंत, मुख्याध्यापक गोपाळ परब, सर्व सदस्य, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर व वराड कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात चैताली लाड 84.83 टक्के, ओंकार परब 78.50 टक्के, धनश्री सरमळकर 74.67 टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वराड ग्रामस्थ संघ मुंबईचे अध्यक्ष अरूण गावडे, सर्व पदाधिकारी, शालेय समिती अध्यक्ष आप्पासाहेब परुळेकर, मुख्याध्यापक प्रिया मयेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे. पोईप येथील सौ. इंदिराबाई वर्दम कला, वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. वाणिज्य- सानिया मीर 75.50 टक्के, नमिता पारकर 73.83 टक्के, भाग्यश्री पाडावे 71 टक्के, कला- सायली सांडव 73.33 टक्के, शीतल घाडीगावकर 69.17 टक्के, वैष्णवी नाईक 67 टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, गोपीनाथ पालव, संस्थापदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. कुंभार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे. वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात वाणिज्य- ऐश्‍वर्या परब 82.33 टक्के, रश्मी पांचाळ 81 टक्के, सानिका मेस्त्री 79.67 टक्के, कला- मानसी घाडी 76.50 टक्के, विष्णू परब 72,67 टक्के, मानसी गिरकर 71.67 टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्‍वस्त कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर, आनंद वराडकर, शेखर पेणकर, सुनील नाईक, विजयश्री देसाई, साबाजी गावडे, सुधीर वराडकर, अनिल फणसेकर, मुख्याध्यापक संजय नाईक यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे. कृ. सि. देसाई शिक्षण मंडळ रामभाऊ परूळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल 92.45 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. कला- वैष्णवी गावडे 375 गुण, हर्ष बिडये 361 गुण, अर्पिता पालव 343 गुण, वाणिज्य- शिव पासले 379 गुण, सचिन सावंत 376 गुण, गौरव सांडव 366 गुण. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे. वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल व सायन्स कॉलेज कट्टाचा निकाल १०० टक्के लागला आहे.यात गौरी धावले ८७ टक्के, साक्षी आंगणे ८६.६७ टक्के, तन्वी वझे ८५.६७ टक्के. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ऍड एस.एस. पवार,संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. आर. पी. बागवे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९५.३३ टक्के निकाल लागला आहे. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हर्ष चव्हाण ७३.१७ टक्के, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी सुधाकर प्रभू ७३.१७ टक्के, विठ्ठल धुरी ६२.६७ टक्के, रोहित डीचवलकर ६१.३३ टक्के, गौरांग चव्हाण ६१.३३ टक्के, जयेश गावडे ६१.३३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.