मालवण बंदर जेटी इथं संध्याकाळी दीपोत्सव !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 22, 2024 11:02 AM
views 279  views

मालवण : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. अयोध्येसह सर्वत्र आनंदमय वातावरण आहे. मालवण राममय झाले आहे.

आज सायंकाळी मालवण बंदर जेटी येथे भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या संकप्लनेतून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याठिकाणी तीस फूट उंच असणारी भव्य राम प्रतिमा उभी करण्यात आली आहे. सायंकाळी सात वाजता निलेश राणे मालवण शहरातील देवस्थान विश्वस्त यांच्या उपस्थिती मध्ये मालवण बंदर जेटी येथे 25000 इलेक्ट्रॉनिक दिव्यांची आकर्षक रोषणाई टप्प्याटप्प्याने प्रज्वलित करून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रात्री 8 वाजता 200 आकाश कंदील प्रज्वलित करून आकाशात सोडण्यात येणार आहेत.

भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्व मालवणवासीय यांनी मोठ्या संख्येने बंदर जेटी येथे उपस्थित राहावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टी मालवण तर्फे करण्यात आले आहे.