प्लास्टिक पिशव्यांवर मालवण नगरपरिषदेने धडक कारवाई..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 16, 2023 15:09 PM
views 362  views

मालवण : प्लास्टिक पिशव्यांवर मालवण नगरपरिषदेने आज धडक कारवाई केली. दहा व्यापाऱ्यांकडून  सुमारे 15 ते 20 किलो प्लास्टिक जप्त केले असून चार हजार रुपये एवढा दंड वसुल केला आहे. पालिकेने अचानक केलेल्या या कारवाईमुळे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्लास्टिक बंदी असतानाही काही व्यापारी प्लास्टिक कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवारी आठवडा बाजारात स्वच्छता निरीक्षक रुपेश जाधव, कर्मचारी सागर जाधव, मिथुन शिगले यांनी धडक कारवाई केली. सर्व व्यापाऱ्यांकडे तपासणी केली.


या कारवाईत 10 व्यापाऱ्यांकडे कमी जाडीच्या प्लास्टिक आढळून आल्या. सर्व प्लास्टिक पथकाने जप्त करत सुमारे चार हजार रुपये दंड वसुल केला आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.