मालवण कर्लाचाव्हाळ बस स्टॉपला लागला एस. टी. थांबा फलक

Edited by:
Published on: August 25, 2023 10:37 AM
views 232  views

मालवण : मालवण मधील कर्लाचाव्हाळ गावच्या बस स्टॉपला अखेर आवश्यक असणारा एस.टी. बस थांबा फलक उभा राहिला आहे. यामुळें गावकरी व प्रवाशी वर्गासाठी बस थांबविणे व गावची ओळख सर्वांसाठी होणे सोयीचे बनले आहे. 

ओरोस येथे शासकीय लेखापरीक्षक म्हणून सेवेत असलेले गावचे सुपुत्र  श्री. अभय सुकाळी यांनी सामाजिक भावनेतून स्वखर्चातून हा बस थांबा चा नामफलक लावला आहे. त्यांच्या हा सामाजिक बांधिलकी बद्दल ग्रामवसियांतून समाधान व्यक्त होत आहे.

नामफलक सावण्यासाठी  विनायक सुकाळी, बळीराम सुकाळी,  मिलिंद द. सुकाळी, ओंकार सांडव यांचे देखील सहकार्य मिळाले आहे. आपल्या गावची ओळखसर्वांना व्हावी, अनोळखी प्रवाशी व वाटसरू यांना लोकेशन समजावं आणि महाराष्ट्र राज्य परिवहन S. T. बसेस ना थांबण्यासाठी हा नामफलक फायद्याचा ठरत आहे.