मालवणच्या घटनेचा राजे प्रतिष्ठान कामगार सेना - राष्ट्रीय छावा संघटनेकडून निषेध

Edited by: विनायक गांवस
Published on: August 28, 2024 13:34 PM
views 147  views

सावंतवाडी : छ. शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा अशी मागणी करत सावंतवाडीत राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांनी निषेध व्यक्त केला. ८ महिन्यांपूर्वी उभा केलेला  अचानक कोसळतो ही बाब खेदजनक असून या बांधकामातील दोषी असणाऱ्यांवर प्रत्येकावर कठोर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर. उपाध्यक्ष मंगेश माणगावकर. सचिव रामचंद्र कुडाळकर. खजिनदार मंगेश माणगावकर. जिल्हा संपर्क प्रमुख शिवा गावडे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी.,जिल्हा महिला अध्यक्ष पूजा गावडे. तालुकाध्यक्ष संजय गावडे. तालुकाध्यक्ष संचिता गावडे. सावंतवाडी शहराध्यक्ष सेजल पेडणेकर उपाध्यक्ष संगीता पारधी. किरण शिर्के समीक्षा मोघे. रवींद्र मोघे. अंकिता माळकर. अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.