मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर यांचा उपोषणाचा इशारा

Edited by:
Published on: January 25, 2025 15:26 PM
views 413  views

सावंतवाडी : तालुक्यातील मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी उद्या प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा सावंतवाडी तहसीलदार व जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. आपल्या निवेदनात ते म्हणतात की, मी श्री. हनुमंत बाबुराव पेडणेकर राहणार मळगाव, तालुका सावंतवाडी आपणांस कळवितो की, श्री. लक्ष्मण केशव गावकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अनाधिकृत बांधकाम केलेले आहे, त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात यावे व केलेले अनाधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात यावे, असा अर्ज ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे केलेला होता. (सदर तक्रारीची नक्कल सोबत जोडत आहे) त्यानुसार ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी आपल्याला ३ जून २०२४ रोजी सदर बाबत चौकशी करून त्याचे संपूर्ण अवलोकन करून योग्य ती कारवाई करावी, असे आदेश पत्रामध्ये दिलेले होते.

परंतु सदर बाबत कोणत्याही प्रकारची चौकशी तथा कारवाई न झाल्यामुळे येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आपल्या कार्यालयासमोर सकाळी १०.३० वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसणार आहे. या नोटीसी नंतर २०/०१/२०२५ रोजी पर्यंत योग्य त्या कारवाईबाबत ठोस उत्तर न मिळाल्यास उपोषण होणार, आणि त्यापासून अनुचित प्रकार किंवा आरोग्यविषयक प्रश्न उद्भवल्यास आपले प्रशासन यास जबाबदार राहील असा इशारा दिला.