
सावंतवाडी : मळगाव इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के एवढा लागला आहे. यात सिया नाटेकर ९३ टक्के गुण मिळवून प्रथम, पूजा कोळेकर ९२.८० टक्के द्वितीय तर निलेश मेस्त्री ९०.८० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तर समृद्धी गवस व कोमल दळवी ९०.४० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.