तब्बल 25000 दिव्यांनी बंदर जेटी उजळली !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 22, 2024 13:43 PM
views 329  views

मालवण : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.  अयोध्येसह सर्वत्र आनंदमय वातावरण आहे. मालवण राममय झाले आहे.

भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण बंदर येथे येथे दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. जेटी येथे तीस फूट उंच असणारी भव्य श्रीराम प्रतिकृती उभी करण्यात आली आहे. बंदर जेटी परिसर 25000 इलेक्ट्रॉनिक दिव्यांनी उजळून गेली आहे.

रात्री 8 वाजता 200 आकाश कंदील प्रज्वलित करून आकाशात सोडण्यात येणार आहेत. भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्व मालवणवासीय यांनी मोठ्या संख्येने बंदर जेटी येथे उपस्थित राहावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टी मालवण तर्फे करण्यात आले आहे.