
कणकवली : गेले १२ वर्ष पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व निरंजन डावखरे करीत आहेत. केवळ ६ वर्षांनी निवडणूक आली की स्वतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे त्यांचे दर्शन होते. त्यामुळे बेरोजगारीचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न व शाळा,महाविद्यालयांचे प्रश्न सभागृहात न मांडणाऱ्या खासदाराच्या विरोधात पदवीधरांनी मतदान केले पाहिजे.केवळ निवडणूक आल्यावर फिरणाऱ्या आमदाराच्या विरोधात मतदान करा. पदवीधरांचे प्रश्न सभागृहात न मांडणाऱ्या आमदाराला घरी बसवा असे आवाहन इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
कणकवली कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस पदवीधर निवडणूक सह प्रभारी प्रवीण ठाकूर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, राष्ट्रवादीचे निलेश गोवेकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेबुलकर,अनिकेत दहिबावकर , सिद्धेश राणे,सरचिटणीस प्रवीण वरुणकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले,कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक लागली आहे.पदवीधरांना रोजगार मिळत नाही.देशात गेल्या काही वर्षात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. भरती प्रक्रिया केली जाते, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची शासन गोळा करीत आहेत.ही रक्कम बेरोजगार असलेल्या लोकांकडून गोळा केली जात आहे.त्यामुळे कोकणात पदवीधरांना संधी देण्यासाठी आपला हक्काचा माणूस आवश्यक आहे.गेल्या १२ वर्षात निरंजन डावखरे यांनी लोकांच्या हिताचा विषय मांडला नाही.निरंजन डावखरे पदवीधर निवडणूक लागली की ६ वर्षाने पुन्हा येतात.पदवीधरांना आवाज म्हणून रमेश किर यांना उमेदवारी दिली आहे.तळकोकणात पहिल्यांदा संधी मिळाली आहे.
शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदेश पारकर म्हणाले,कोकण पदवीधर मतदार निवडणूक आहे.रमेश कीर हे आमचे उमेदवार आहेत,संपूर्ण राज्यात परिवर्तनाची लाट आहे.आपला हककाचा आमदार निवडून द्यावा.सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा सेनेच्यावतीने मोठी मतदार नोंदणी केली आहे.
शिवसेना विधानसभा सतीश सावंत म्हणाले,२६ जूनला निवडणूक होणार आहे.गेले १२ वर्षे निरंजन डावखरे यांची कामगिरी असमाधानकारक आहे.त्यांनी बेरोजगारीवर, शैक्षणिक संस्थाचे प्रश्न किंवा पदवीधरांचे प्रश्न घेऊन कुठलाही लढा उभारला नाही,कुठल्याही आंदोलनात सहभाग घेतला नाही. बेरोजगार लोक आहेत,त्यांनी विरोधात मतदान करा.जिल्ह्यात चांगली मतदार नोंदणी केली आहे.धनलक्ष्मी दर्शन घ्या,मात्र बळी पडू नका,मतदान मात्र रमेश किर यांना करा.सरकारच्या धोरणाचा निषेध करा,असे आवाहन त्यांनी केले.
आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर म्हणाले,कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक महत्वाची आहे.यावेळी तरुण मतदारांचा आकडा वाढलेला आहे.नोंदणी मध्ये वाढ असल्याने रमेश किर यांना चांगले मतदान होईल.गेल्या १२ वर्षात डावखरे हे फक्त निवडणूक आली की दिसतात,त्यासाठी पदवीधरांची प्रश्न मांडण्यासाठी आमदार असावा. युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले,आम्ही युवा सेनेच्यावतीने मतदार नोंदणी केली आहे.निवडून गेल्यानंतर किती वेळा डावखरे जिल्ह्यात आलेत? लोक विचारणा करत होते? पदवीधर आमदार कोण आहेत?निष्क्रिय आमदार आहे, बेरोजगारीचा प्रश्नावर बोलत नाहीत .त्यांना आता राखण्याची वेळ आली आहे.