
देवगड : देवगड तालुक्यातील तळवडे बागतळवडे तळेबाजार ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी ग्रामसेवक करा अशी सूचना तळवडे ग्रामसभेवेळी मांडण्यात आली. या ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा असे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.प)जि. प.सिंधुदुर्ग यांना देण्यात आले आहे.
तळवडे बागतळवडे तळेबाजार या ग्रा.प.चा अतिरिक्त चार्ज ग्रामअधिकारी यांच्या जवळ असून तळवडे ग्रा.प. मध्ये ३ महसूल गाव समाविष्ट आहेत. तळवडे ग्रामपंचायत बाजारपेठ व क्षेत्रफळाने मोठी असल्याने येथील ग्रा.प.ला दैनंदीन कामकाजासाठी ग्रामसेवक कायमस्वरूपी करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल अशा सूचना यावेळी तळवडे तळेबाजार बागतळवडे ग्रामसभे वेळी मांडण्यात आली आहे.










