NEMS मध्ये मकरसंक्रांतीचा उत्साह

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 16, 2024 06:13 AM
views 129  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे व NEMS स्मार्ट किड्स तळेरे येथे मकरसंक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी केजीचे विद्यार्थी विविध पारंपारिक वेशभूषेमध्ये आले होते. या विद्यार्थ्यांसाठी पतंग बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच त्यांना तिळगुळाचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन केजी शिक्षिका गौरी पवार, चैताली राणे, भक्ती पाटील, श्वेता आलते, तृप्ती साटविलकर यांनी केले होते.