
कणकवली : कासार्डेत बंदी घातलेल्या भागात सिलिका मायनिंग उत्खनन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कासार्डेत मायनिंग माफीयांचा मुजोरपणा समोर आल्याने कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
कासार्डेत नाग सावंतवाडी इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या भागात ही मायनिंग असल्याने प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी ही मायनिंग सील करून त्या जमिनीवर बोजा चढवण्यात आला होता. त्याच ठिकाणी पुन्हा उत्खनन झाल्याची माहिती मिळताच कणकवली तहसीलदार आर जे पवार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी संतोष नागावकर व नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांना जागेची पाहणी करण्यास सांगितले. उत्खनन झाले असल्याचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे आला. तत्परतेने तहसीलदार आर. जे. पवार यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे ETS ची मोजणी करण्यासाठी पत्र पाठवले आहे. लवकरच ही मोजणी होऊन पुढील कारवाई करणार असल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले