बहुसंख्य भारतरत्न कोकणातील !

सिंधुदुर्ग राज्याची बौद्धिक राजधानी : सागर देशपांडे
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 20, 2023 10:43 AM
views 516  views

सावंतवाडी : भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. भोसले नॉलेज सिटीत काही क्षणात ते १ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या संवादाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे यांनी भोसले नॉलेज सीटीत आज विज्ञानाची दिवाळी असल्याचं सांगितलं. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्याची बौद्धिक राजधानी असल्याचं म्हणत जिल्ह्यातील मुलांचे कौतुक केलं. यावेळी बोलताना त्यांनी सावंतवाडीचे सुपुत्र जनरल जगन्नाथराव भोसले, तसेच कोकणचे सुपुत्र नाथ पै ते डॉ. नरेंद्र दाभोलकर अशा अनेक कोकण सुपुत्रांच्या कामाच कौतुक केलं. ज्यांना भारतरत्न मिळाली त्यातील बहुसंख्य कोकणातील असल्याचही त्यांनी सांगितले. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, माध्यम सल्लागार जयु भाटकर, ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे आदी उपस्थित आहेत.