मेरी मिट्टी मेरा देश | माजगाव ग्रा. पं.च्यावतीने उपक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: August 11, 2023 19:27 PM
views 138  views

सावंतवाडी : मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाअंतर्गत आज माजगांवमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.

शिलाफलक अनावरण त्यानंतर पंचप्रण शपथ ,७५ देशी वृक्ष लागवड करण्यात आली. शहीद जवान कुटुंबिय, माजी सैनिक, निवृत पोलिस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते. त्यांनी युवकांना स्पर्धा परीक्षा व सैन्य भरती साठी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे वृक्षलागवड व घनकचरा व्यवस्थापनासाठी माजगांव ग्रामपंचायतला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी व्यासपीठावर सरपंच डॉ अर्चना सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, विकास सावंत, अशोक दळवी, चंद्रकांत कासार,बाळा वेजरे, संजय कानसे आदींसह माजगांव ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते