संदीप गोसावी यांचा माजगांव ग्रा.प.तर्फे सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: June 02, 2023 20:34 PM
views 134  views

सावंतवाडी : माजगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी यांची आंबोली ग्रामपंचायत येथे बदली झाल्यानं त्यांना माजगाव ग्रामपंचायतीच्यावतीन निरोप देण्यात आला. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, सरपंच डॉ. अर्चना सावंत यांनी त्यांचा गौरव केला. त्यांचा जागी सौ.श्रद्धा अमित तेंडुलकर यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी यावेळी माजी जि.प.अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सभापती अशोक दळवी, सरपंच डॉ. अर्चना सावंत, उपसरपंच बाळा वेजरे, अजय सावंत, आबा सावंत, सचिन गावडे, गुरु घाडी इ.उपस्थित होते.