देवगड हापूसचा दर्जा टिकवा

बागायतदारांना किंमत वाढवुन देण्याची जबाबदारी मी घेतो : अशोक हांडे
Edited by: संदीप देसाई
Published on: January 11, 2024 14:35 PM
views 171  views

देवगड : देवगड हापूस आंब्याच्या मालाची किंमत बागायतदारांना वाढवुन मिळविणे हाच आमचा अजेंडा आहे. यामुळे बागायतदारांनी आंब्याची गुणवत्ता व दर्जा टिकविला पाहिजे, मग तुमच्या मालाची प्रत व किंमत वाढविण्याचे काम माझे, असे प्रतिपादन  मराठी बाणाचे अशोक हांडे यांनी व्यक्त केले. देवगड येथे इंद्रप्रस्थ सभागृहामध्येदेवगड इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये आयोजित आंबा बागायतदारांच्या मार्गदर्शन- सुसंवाद मेळाव्याच्यावेळी बोलत होते.

आंबा बागायतदार शेतक-यांशी सुसंवाद साधण्यासाठी  वाशी मार्केटमधील मुख्य व्यापारी व 'मराठी बाणा' कार्यक्रमाचे सर्वेसर्वा अशोक हांडे  यांनी आंबा बागायतदार, व्यापारी, दलाल, निर्यातदार, वाहतूकदार आणि सामान्य शेतकरी या सगळ्यांसाठी एकत्र अशा मेळाव्याचे आयोजन केल होते. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, विदयाधर जोशी, दिगंबर तोडणकर, युनियन बँक ऑफ इंडिया देवगड शाखेचे मॅनेजर,आंबा निर्यातदार  राजाराम लक्ष्मण कंपनीचे रत्नाकरशेठ कराळे, प्रमोद ऊर्फ भाऊ पाटणकर, शैलेश बओंडआळए, नरेश डामरी, प्रकाश डामरी, सागर गावकर, रावजी वाळके, उमेश वाळके, राजेश वाळके, केदार तेली, बाबा कोकरे, हर्षद जोशी, मंदार तेली आदी बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

यावेळी संवाद साधताना हांडे म्हणाले की, देवगडचा आंबा बागायतदार हा आर्थिकदृटया सक्षम होवून या ठिकाणी आर्थिक सुबकता निर्माण करणारा असला पाहिजे. भविष्यामध्ये नक्कीच हि ताकद देवगडच्या आंबा बागायतदारांमध्ये निर्माण होईल. कारण येथील बागायतदार शेतकरी हा आत्मनिर्भर असून आत्मियतेने व मेहनीतीने बागायतींची कामे करीत असतो. म्हणूनच आज देवगड हापूसला जगप्रसिध्द हापूस म्हणून नाव मिळाले आहे. हे नाव इथल्या शेतक-यांच्या मेहनतीमुळेच मिळाले आहे. यामुळे या शेतक-यांची मेहनत व बागायतींवरती येणारा खर्च हा प्रचंड प्रमाणात असतो. काही वेळा उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त अशी शेतकरी बागायतदारांची अवस्था नैसर्गिक आपत्तीमुळे होत असते. मात्र या शेतकरी बागायतदारांच्या मालाला त्यांची पत राखून जास्तीत जास्त किंमत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. येथील शेतक-यांनीही आपल्यावरती टाकलेला विश्वास हा त्या त्या वेळी सार्थकीच लावला. येथील शेतकरी बागायतदारांचे हित जोपासणे हेच एकमेव ध्येय्य आपल्या समोर असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी फळमाशी वरती काय उपाययोजना बाबत शेतकरी व हांडे यांच्यात संवाद झाला.  देवगड युनियन बँकेचे बँक मॅनेजर यांनीही बागायतदार यांना आंबा पिक योजनांची माहिती दिली. वाशी मार्केटमधील शेतकरी बागायतदारांचे हित जोपासणारे  अशोक हांडे यांनी बागायतदार यांनी त्यांच्या प्रती ऋण व्यक्त केले. यावेळी भारावून जावून देवगड हापूस आंब्यावरती गीत गाऊन, शेतकरी व बागायतदारांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.