भारतीय जनता युवा मोर्चाच्या रोहा तालुकाध्यक्षपदी महेश ठाकूर

माजी आमदार अवधूत तटकरे, युवा नेते वैकुंठ पाटील यांसह कार्यकर्त्यांनी केलं अभिनंदन
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 22, 2022 18:05 PM
views 166  views

धाटाव : भारतीय जनता पार्टी रोहा तालुका युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कोलाड विभागातील खमके नेतृत्व महेश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शिफारशीनुसार तर आमदार रविशेठ पाटील यांच्या सूचनेनुसार महेश ठाकूर (रा. पालेखुर्द) यांची रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ठाकूर यांच्या नुकत्याच झालेल्या निवडीचे माजी आमदार अवधूत तटकरे, युवा नेते वैकुंठ पाटील यांसह भाजपा युवा कार्यकर्त्यनी अभिनंदन केले.विभागाला सक्षम नेतृत्व मिळाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 

      श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा रोह्याचे माजी नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांनी नुकताच भाजपा मधे प्रवेश केला.त्यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ते सुद्धा भाजपवासी झाले. या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये रोहा तालुक्यातील पालेखुर्द गावचे युवा नेतृत्व महेश ठाकूर यांनी सुद्धा प्रवेश केला.शेतकरी कुटुंबातील ठाकूर यांनी अथक प्रयत्नाने आपली चांगली छबी हळूहळू राजकारणात उमटवली आहे.राजकारणात सुरुवात करण्याआधी ते अनिल तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले गेले.त्यानंतर त्यांनी एक माफी अवधूत तटकरे यांची साथ धरून कायम त्यांच्याच सोबत राहिले.रोह्यात विश्रामगृहात नुकत्याच झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी ठाकूर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.       

    यासमयी भाजपचे दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मापारा,रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर,युवा मोर्चाचे राजेश डाके,जयदीप तांबुटकर,नरेश कोकरे, वैभव कुलकर्णी,अविनाश कान्हेकर,कृष्णा बामणे,यज्ञेश भांड,सनल  कुमार,आंनद लाड,शिवाजी पाटील,भाऊ शेलार,संजय लोटणकर सरचिटणीस श्रेया कुंठे याच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.युवा मोर्चाच्या रोहा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल महेश ठाकूर यांचे माजी आमदार अवधूत तटकरे,युवा नेते वैकुंठ पाटील यांसह त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.