
सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्याला लागूनच असलेल्या साळ पुनर्वसन येथील महेश नवनाथ सावंत याची दिल्ली येथील गणतंत्र दिवस परेडसाठी निवड करण्यात आली आहे. 2025 या गणतंत्र दिवस परेड साठी पुणे येथे डी वाय पाटील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असलेला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग जवळील साळ पुनर्वसन येथिल महेश नवनाथ सावंत याची पुणे एनसीसी मधून दिल्ली येथे होणाऱ्या 26 जानेवारीच्या गणतंत्र दिवस परेड साठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी महेश याने अथक परिश्रम केले व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तो इथपर्यंत पोहोचला आहे. त्यासाठी त्याचे सावंत कुटुंबाकडून महाविद्यालयातून मित्र परिवारातून कौतुक होत आहे. सावंत कुटुंबासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
महेश याचे वडील नवनाथ सावंत पदवीधर शिक्षक म्हणून गोव्यातील शांता विद्यालय येथे कार्यरत आहेत. तर त्याची आई माटणे दोडामार्ग येथे प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. तर महेश याचे आजोबा भारतीय सैन्यात सुभेदार म्हणून कार्यरत होते.