जिल्हा नियोजन समितीवर 'विशेष निमंत्रित'पदी महेश सारंग !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 03, 2024 12:07 PM
views 138  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर "विशेष निमंत्रित" पदी भाजपचे नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे उपसचिव नि.भा.खेडकर यांनी त्यांना याबाबतच नियुक्तीपत्र दिलं आहे. या नियुक्तीनंतर महेश सारंग यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. 


महाराष्ट्र जिल्हा नियोजन समितीत सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ५ व्यक्तींना "विशेष निमंत्रित" म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येते. भाजपचे नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.