
सावंतवाडी : कोलगांव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सावंतवाडी ते कोलगांव,कुणकेरी, आंबेगाव जोडणारे पुल व रस्ता करण्याचे हे काम बरीच वर्षे प्रलंबित होते. ग्रामस्थांना पावसाळ्यात लोकांना तासंतास पुलावर पाणी आल्यामुळे उभ राहावं लागत होत. शाळकरी मुलांचे पण खूप हाल होत होते. त्यामुळे रहदारी करणे कठीण झाले होते. अशावेळी सिंधुदुर्ग जि.म.सह.बँकचे संचालक महेश सारंग यांच्या अथक परिश्रमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी १ कोटी ८९ लाख ५९ हजार ७९७ रू.चे काम मंजुर केले होते.त्या कामाचे भूमिपूजन आज दिनांक १ मे रोजी सिंधुदुर्ग जि.म.सह.बँकचे संचालक महेश सारंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोलगांव सरपंच संतोष राऊळ,उपसरपंच दिनेश सारंग,ग्रा.प.सदस्य संदीप हळदणकर ,रोहित नाईक,सौ.प्रणाली टिळवे,सौ.रसिका करमळकर तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर नाईक,कोलगांव सोसायटी चेअरमन विरेंद्र धुरी ,दिलिप भालेकर ,बलवंत कुडतरकर,दिपक डामरेकर,सलमा बेगम,सलाम शेख,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच कुणकेरी सरपंच सौ .सोनिया सावंत, सुनिल परब उपसरपंच , प्रमोद सावंत, बाळा सावंत, बाळकृष्ण सावंत गुरू परब ,कृष्णा मेस्त्री,शंकर मेस्त्री,नाना सावंत तसेच आंबेगाव सरपंच शिवाजी उर्फ संजू परब,उपसरपंच रमेश गावडे, योगेश गवळी साक्षी राऊळ संतोष राणे, ज्ञनेश्वर परब , गजानन सावंत, कृष्णा कुंभार ,संतोष काटाळे,अशोक शिंदे, सचिन परब,संतोष आगचेकर, अशोक केळूसकर, बाळा तेलि, नाना आंगचेकर, रवी गावडे, समीत काळे, महादेव काटाळे, साईराज आंगचेकर, पांडुरंग कडव आदी उपस्थित होते.