
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाल साहित्यिक महेश काणेकर यांना वेंगुर्ला नगर वाचनालयाचा कै. कृष्णा आसोलकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा बाल साहित्य सेवा पुरस्कार वेंगुर्ला खेडेकर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर धनराज गोस्वामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नगरवाचनाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, उपाध्यक्ष शांताराम बांदेकर आदी उपस्थित होते. महेश काणेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी लेखन करावयाचे असल्यास प्रचंड वाचन करणे आवश्यक आहे.











