
देवगड : महेश मधुकर देसाई यांची देवगड पोलीस स्टेशन च्या उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. त्यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यत देवगड पोलीस स्थानकात झाली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
यावेळी देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले. महेश देसाई यांनी १ एप्रिल १९८१ रोजी पोलीस सेवेत रुजू होऊन सावंतवाडी, देवगड, स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखा ओरोस, कुडाळ, ओरोस, मालवण पोलीस ठाण्यात सेवा बजावून १ ऑगस्ट २०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती होऊन जयगड (रत्नागिरी)येथे पदभार घेतला या कालावधीत त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने चांगले काम करून दाखवले होते.