
कणकवली : कणकवली शहरातील मधलीवाडी येथे राहणारे महेंद्र शिवाजी राणे (५२) यांचे २३ नोव्हेंबरला मुंबईत एका अपघातात निधन झाले. महेंद्र हे नातेवाईकांच्या लग्नासाठी मुंबईत गेले होते. रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीची धडक बसली. या अपघातात त्यांचे निधन झाले.
त्यांच्यावर सोमवारी रात्री कणकवलीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र हे कणकवलीतील एका दुचाकी शोरूममध्ये कामाला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.












