
सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी महेंद्र किणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला असून, फास्टट्रॅक पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाची रखडलेली कामं मार्गी लावण्याचे आव्हान त्यांनी स्वतःसमोर ठेवलं आहे.
हे आव्हान त्यांनी स्वीकारलं असून त्यासाठी ते कामाला लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातील एकूण 391 मंजूर विकासकामांपैकी 35 काम पूर्ण झाली आहेत. तर 135 विकासकाम प्रगतीपथावर असून सुरू आहेत. तर तब्बल 221 काम ही रखडलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे सुपुत्र असल्यामुळे ही काम मार्गी लावत जनतेला सेवा देण्याच उद्दीष्ट कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी डोळ्यासमोर ठेवल आहे. 350 कोटींची कामे पूर्ण करण्याचं त्यांच धेय्य आहे. त्यासाठी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच कामाला सुरुवात केली आहे. बांधकाम विभागातील अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेऊन रखडलेली कामं पूर्ण करण्यावर त्यांचा फोकस केला आहे.
गेल्या सहा महिन्यांत पदाच्या अस्थिरतेमुळे बांधकाम विभागाच्या कामकाजात शिथिलता आली होती. निधी उपलब्ध करून देखील विकासकाम होत नव्हती. मात्र, महेंद्र किणी यांच्या आगमनानंतर नवी उर्जा बांधकाम विभागास प्राप्त झाली आहे. उप अभियंता, शाखा अभियंतांची विभागातील रिक्तपद भरण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. महेंद्र किणी यांनी पालघर जिल्ह्यापासून आपल्या सेवेला सुरूवात केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर जनतेची कामे लवकर पूर्ण करण्याचा त्यांचा उद्देश आहे.