
दोडामार्ग : कुडासे येथील महेंद्र मायबा देसाई यांच्या घोंगुर्ले येथील काजू बागायातीला बुधवारी दुपारी आग लागल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. भर दुपारी लागलेल्या आगीत सहाशे कलमे जळून खाक झाली आहेत.
मोठ्या कष्टाने व मेहनतीने देसाई यांनी पाच-सहा वर्षांपूर्वी ही काजू बागायती उभी केली होती. मात्र बुधवारी दुपारी त्यांच्या आजूबागायतीला अचानक आग लागली. आणि या आगीने काही अवधीतच होत्याचे नव्हते केलं. भर दुपारी लागलेल्या भिजवण्याची देसाई यांनी कसोसीने प्रयत्न केले. परंतु कडक उन्हाळा आणि दुपारची वेळ असल्याने ही आग विजवता आली नाही. त्यामुळे पूर्ण ६०० कलमांची उत्पन्न देणारी बाग जळून खाक झाली. यात देसाई यांचं मोठ नुकसान झालं असून नुकसानीची भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे.