महायुतीच्या उमेदवाराला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य देणार : दिपक केसरकर

Edited by: भरत केसरकर
Published on: April 11, 2024 09:45 AM
views 357  views

सावंतवाडी : ही निवडणूक आता मोदी साठीची निवडणूक राहिली आहे.आपण शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव उमेदवारीसाठी लावून धरले आहे.तर भाजपकडून नारायण राणे यांचे नाव पुढे आले असून भाजपने ते लावून धरले आहेत. पण जो उमेदवार घोषित करण्यात येईल त्याच काम आपण करायच आहे.यामुळे उमेदवार कोणीही असो तो महायुतीचा उमेदवार म्हणून आपण त्याचा प्रचार करून निवडणून द्यायच आहे.अशी प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी केले.सावंतवाडी येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात दिपक केसरकर बोलत होते.

यावेळी दिपक केसरकर बोलताना म्हणाले आमचे नेते कै.बाबासाहेब ठाकरे यांचे विचार होते की आपल्या देशाची सत्ता आपल्या हातात द्या 307 कलम रद्द करेन आणी राममंदिर बानेन.ही घोषणा पूर्णत्वास आणण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले.काही झल तरी हा उमेदवार नको तो उमेदवार नको हे आता चालणार नाही.जो कोणी उमेदवार असेल तर त्याच काम आपण केल पाहिजे.कारण आपणाला आता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे.

आपल्या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे कबुलयतदार गावकर फाईल सहीसाठी गेली होती.पण साधी सही करून ही फाईल क्लिअर करून देण्याची हिंमत उद्धव ठाकरेनी दाखवली नाही.काजूला हमीभाव मिळावा यासाठी कोटीवधी रूपयांचा निधी देण्याचा तत्कालीन सरकारने ठरवल होत. पण उद्धव ठाकरेंनी साध ढुकूनही बघितल नाही. हजारो कोटींचा निधी मी सावंतवाडी- दोडामार्ग- वेंगुर्ले या तीन तालुक्यासह मतदार संघासाठी आणला.पण विरोधक चुकीच्या पद्धतीने बदनामी करत आहेत.येथील वातावरणातील बदलामुळे शेळ्या मेल्या तर त्याचा इशू विरोधकांनी केला. स्थानिक पातळीवर वाद राहणार आहेत.किरण येथे दोनच मोठे पक्ष आहेत.अनेकवेळा भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत स्थानिक पातळीवर झाली आहे.पण आता अस होता कामा नये.आता आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणला पाहिजे.जेथे ज्याचा उमेदवार आहे तेथे प्रत्येक पक्षाचा आणी महायुतीचा उमेदवार आणी पदाधिकारी प्रचार करत आहे.

भाजपमध्ये मी त्यावेळेस गेलो असतो तेथेही मला मंत्रीपद मिळू शकल असत.पण बाळासाहेबांचे विचार बघून मी शिवसेनेत गेलो होतो.पण उद्धव ठाकरेंनी काॅगेसशी हातमिळवणी करून स्वताचे विचार बाजूला ठेवले. माझ्या एका मित्राने असे विधान केल की मला खासदार व्हायचंय. पण अस असत तर मी माझी उमेदवारी सहा महिन्यापूर्वी घोषित करून घेतली असती.आणी खासदारीची उमेदवारी घेतली असती.पण अस काहीच नाही.उगाचच मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.असा जोरदार टोला प्रवीण भोसले यांना दिपक केसरकर यांनी लगावला. माझ्या नावाने उद्घाटनाचे नारळ फोडले तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही.फोडले तर फोडले.मला निधी जरा जास्त मिळतो कारण मी मुख्यमंत्री यांचा लाडका आहे.त्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याच कारण नाही.तुम्ही नारळ फोडत रहा.असा राजन तेलींना टोला लगावला आहे. सावंतवाडी मतदारसंघातून किमान एक लाखाचे लीड महायुतीच्या उमेदवाराला देण्यासाठी तुम्ही कामाला लागा.आता मागे फिरायच नाही.नारायण राणेंशी माझा कोणताही तात्विक वाद नाही.आमची चांगली मैत्री आहे.आज त्यांना आपण वाढदिवसाच्याशुभेच्छा पण दिल्य असेही दिपक केसरकर म्हणाले. 

यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अशोक दळवी,जिल्हा संघटक रुपेश पावसकर,राजन पोकळे,नीता सावंत,गणेशप्रसाद गवस,अॅड.नीता सावंत,भारती मोरे,दिपाली सावंत,विशाल बांदेकर,महेश सामंत,गुणाजी गावडे,नितीन मांजरेकर,विनायक येरम,प्रेमानंद देसाई यासह शिवसेनेचे नेते,पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते.