वेंगुर्ल्यात श्री रामेश्वराला श्रीफळ अर्पण ; महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ !

दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: दिपेश परब
Published on: April 27, 2024 14:47 PM
views 154  views

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ अर्पण करून व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना भरगोस मतांनी विजयी होण्यासाठी श्री रामेश्वराला साकडे घालण्यात आले. तर प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारावर भर देऊन महायुतीच्या विविध योजना जनतेपर्यंत पोचवण्याबाबत मंत्री केसरकर यांनी सूचना केल्या. 

    यावेळी  जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे  प्रदेश सचिव एम. के. गावडे, महिला नेत्या प्रज्ञा परब, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, शिवसेना जिल्हा संघटक रूपेश पावसकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नियोजन मंडळ सदस्य दिलीप गिरप, कुणाल सरमळकर, साईप्रसाद नाईक, सुषमा प्रभू-खानोलकर, वृंदा गवंडळकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, शिवसेना महिला तालुका संघटक प्राची नाईक, वृंदा मोर्डेकर, कोचरा सरपंच योगेश तेली, सुनिल मोरजकर, प्रितेश राऊळ, कृपा गिरप-मोंडकर, वसंत तांडेल, दादा केळूसकर, रविंद्र शिरसाट, जगन्नाथ सावंत, युवासेना शहर प्रमुख संतोष परब, प्रणव वायंगणकर, शरद मेस्त्री, भूषण सारंग, मयुरेश शिरोडकर, नितीन चव्हाण, लक्ष्मीकांत कर्पे आदींसह महायुतीच्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई आणि मनसेच्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.