
सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा कस्टम ऑफिससमोर विद्युत खांबाला चिकटून बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली. ऐन शेती हंगामात बैल गमावल्यान शेतकरी श्री. रेडकर यांच मोठ नुकसान झालं आहे.
शेतामध्ये असणाऱ्या विद्यूत पोलला चिकटून ही घटना घडली. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे मुक्या जनावरानं नाहक आपला जीव गमावला. सुदैवानं मनुष्य हानी टळली असली तरी ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी हनुमंत रेडकर यांनी आपला बैल गमावला आहे. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी आरोंदा सरपंच सायली साळगावकर यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी केली. कृषी अधिकारी यांना पंचनाम्यासाठी बोलावले असल्याची माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हेमंत नाईक उपस्थित होते.