महावितरण रत्नागिरी मंडळाच्या अधीक्षक अभियंतापदी स्वप्नील काटकर रुजू

Edited by: ब्युरो
Published on: July 10, 2023 19:13 PM
views 90  views

कोकण परिमंडळ :  महावितरण रत्नागिरी मंडळाच्या अधीक्षक अभियंता पदी स्वप्नील काटकर हे नुकतेच रुजू झाले आहेत. प्रभारी अधीक्षक अभियंता नितीन पळसुले देसाई यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.


श्री.काटकर हे यापूर्वी प्रकाशगड मुख्यालयात कार्यरत होते. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. श्री.काटकर यांनी विद्युत अभियांत्रिकी शाखेत व विपणन व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण प्राप्त केले आहे. त्यांचा विद्युत क्षेत्रात विविध पदावर कामाचा 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. जून 2003 मध्ये तत्कालीन विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता या पदावर ते रुजू झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सांगली, कोल्हापूरात चाचणी विभागात व प्रकाशगड मुख्यालयात कामकाज केले आहे.