
रत्नागिरी : 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार कैस नुर महम्मद फणसोपकर यांनी महाविकास आघाडीचे उमदेवार बाळ माने यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील खाडीपट्टी भागातील मच्छीमारांच्या समस्या अद्यापही कायम असून त्या समस्या सोडविण्याचा विश्वास महाविकास आघाडी तर्फे देण्यात आल्यामुळे आपण उमेदवार बाळ माने यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितलं.
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष दिपक राऊत, महाराष्ट्र प्रदेश सचिव व्ही जे एन टी विभाग परशुराम खेत्री,आतिफ साखरकर,विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष इरफान होडेकर, रत्नागिरी शहर काँग्रेस उपाध्यक्ष अशपाक अब्दुल्ला झारी, युवक तालुकाध्यक्ष शैबाज होडेकर, शहर अध्यक्ष फइम फणसोपकर, आकिब काझी,महिला तालुकाध्यक्ष सलवा नावडे, महिला शहर अध्यक्ष अनिता शिंदे, अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.