वेंगुर्ले भाजपा कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी..!

Edited by: दिपेश परब
Published on: April 11, 2024 13:50 PM
views 76  views

वेंगुर्ले : भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महायुतिच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी तालुक्यातील भाजपा - शिवसेना व राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) चे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , शिवसेना तालुकाप्रमुख नितिन मांजरेकर,  जिल्हा नियोजन सदस्य सचिन वालावलकर, मा.नगराध्यक्ष राजन गिरप , शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे , शहर प्रमुख उमेश येरम , राष्टवादीचे मकरंद परब, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दाजी पेडणेकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर ,सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण उर्फ राजू परब , लक्ष्मीकांत कर्पे, विजय रेडकर, जिल्हा पदाधिकारी निलेश सामंत, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , समीर कुडाळकर, मारुती दोनशानटी ,अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा,जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , बाळा दळवी , रविंद्र शिरसाठ, सुरेश धुरी,शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर,मच्छिमार नेते दादा केळुसकर व वसंत तांडेल , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी , किसान मोर्चाचे विजय रेडकर ,मा.सभापती प्रीतेश राऊळ ,  पुंडलिक हळदणकर,मा.उपनगराध्यक्ष दाजी परब ,  युवा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर , कार्यालय प्रमुख छोटु कुबल उपस्थित होते .