
देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील महात्मा गांधीविद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, तळेबाजार संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार ता. देवगड,जि. सिंधुदुर्ग या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संदीप तेली होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून देवगडचे नायब तहसीलदार खरात यावेळी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत शिंदे (उद्योजक व अंबा बागायतदार), मंगेश धुरी व माजी विद्यार्थी सिद्धेश शिरसाठ आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी सिद्धेश शिरसाट यांनी शाळेस या पुढेही भरीव अशी मदत करण्याची ग्वाही दिली. तर उद्योजक तथा आंबा बागायतदार मंगेश धुरी यांनी प्रशालेस २० हजार रुपये देणगी जाहीर केली. प्रशांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी ५ हजार रुपये बक्षीस स्वरूपात जाहीर केले. यावेळी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक एन. एम. हिंदळेकर यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदिप तेली, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर,तळवडे बागतळवडे तळेबाजार सरपंच गोपाळ रुमडे, खजिनदार संतोष वरेरकर, प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके, सचिव कृष्णा साटम, सदस्य विश्वास सावंत,संजय जाधव, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुरेंद्र कदम,सदस्य, मंगेश मांजरेकर,धनंजय कुळये, शैलेश साटम,आर्या भारती, संतोष पवार, माजी विद्यार्थी पालक संघ व सखी सावित्री संघाच्या सदस्या गौरी लाड, सुजाता म्हसकर,माजी सरपंच पूजा दुखंडे,शिक्षक पालक संघाचे सदस्य दत्तप्रसाद जोईल संस्थाचालक, सर्वशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इतर पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची साथ लाभली. यावेळी वंदे मातरमने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुशील जोईल यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश वाळके सर यांनी केले. सूत्रसंचालन जी. के. तेली यांनी केले.










