
सावंतवाडी : शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेआधी सोबतच्या ५० आमदारांना आपल्यासोबत महाशक्ती आहे असं सांगितलं होतं. ही महाशक्ती म्हणजे 'भाजप'. आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फुट पडली आहे. शरद पवारांचे पुतणे अजित पवार शिंदे सरकारला जाऊन सामिल झाले. उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीतच दोन गट पडले असताना सावंतवाडीत लागलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत.
काय आहे बॅनरमध्ये ?
महाशक्ती शरद पवार, साहेब आम्ही तुमच्या सोबत..अशी बॅनरबाजी शहरात ठिकठिकाणी केली आहे. हे बॅनर कुणी लावलेत याचा उल्लेख त्यावर नाहीय. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात शरद पवार हेच जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याचे स्पष्ट केल आहे. सावंतवाडीतील कार्यकर्ते देखील शरद पवार यांच्या पाठिशी असून महाशक्ती शरद पवार बॅनर लक्षवेधून घेत आहेत.