'महासंस्कृती महोत्सव' मतांची पुडी बांधण्यासाठी : रूपेश राऊळ

मुदतपूर्व बॅनर हटवल्यान शिवसैनिक संतप्त !
Edited by: विनायक गावस
Published on: February 06, 2024 09:30 AM
views 197  views

सावंतवाडी : क्रिकेटच मैदान हे क्रिकेटसाठीच वापराव ही क्रीडाप्रेमींची भूमिका आहे. मात्र, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी योग्य मार्गदर्शन व जागा न निवडल्यानं हे कार्यक्रम त्याच  मैदानात होत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी  लोकहिताची भुमिका घेण आवश्यक आहे. आज आमदार, खासदार सोडले तर इतर लोकप्रतिनिधी नाहीत ही दुर्देवाची गोष्ट आहे. सगळ्यांचं स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासक सांभाळत आहेत. याचा फटका स्थानिकांना बसत आहे. आजच्या महासंस्कृती महोत्सवात देखील  स्थानिक कलावंतांना स्थान दिला गेलेल नाही. हा त्यांचाच एक भाग आहे. केवळ आपली मतांची पुडी बांधण्याच राजकारण पडद्यामागे होत आहे. प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून शोबाज कार्यक्रम केले जात असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केला. 

यावेळी ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅंनर नगरपरिषदेकडून काढण्यात आले. रितसर परवानगी घेऊन पैसे भरलेले असताना हे बॅनर का काढले गेले ? याचा जाब मुख्याधिकारी यांना आम्ही विचारला. त्यांनी यासाठी अधिकाऱ्यांची चुक झाल्याच सांगत माफ कराव असा आवाहन केल. परंतु, पैसे भरलेले असताना माफी का द्यावी ? आम्ही लावलेल्या बॅंनरच्या ठिकाणी शासनाचे बॅनर असतील तर ठिक आम्ही करू माफ. पण, अन्य बॅनर लागले तर सुडबुद्धी काय असते हे आम्ही पण दाखवून देऊ. आमचे बॅनर हे सुबुद्धीने व दबावाखाली काढले गेले आहेत. पोटदुखी पोटी हा प्रकार झाला आहे. त्यामुळे जर आमचे बॅनर होते तसे लागले नाही तर त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा रूपेश राऊळ यांनी दिला. याप्रसंगी अशोक परब ,आबा सावंत, शैलेश गवंडळकर, प्रशांत भोगटे,फिलीप रोडरीक, संदेश केरकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.