महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी संजय गावडे

६० कर्मचाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना संघटनेत प्रवेश
Edited by: दिपेश परब
Published on: August 31, 2023 14:37 PM
views 206  views

वेंगुर्ले : महाराष्ट्र एस टी कामगार सेना वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी संजय गावडे यांची निवड करण्यात आली आहे. आज जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वेंगुर्ले येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेत हा निवड कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, बाळा गावडे, संदेश निकम, तुषार सापळे, ॲड. जी. जी. टाककर यांच्या सह अन्य शिवसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या नव्या कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष - नारायण होळकर, सचिव - मार्टीन डीसोजा, सहसचिव  विशाल पेडणेकर, खजिनदार - गौरेश राणे, विवेक नवार, सहखजिनदार  - अभि परब, महिला संघटक - निहारीका होळकर, धनश्री तांडेल, कायदेशिर सल्लागार  - ॲड. जी. जी. टाककर, विभागिय कार्यकारणी सदस्य अनंत नाईक, मनोज दाभोलकर, उदय चिंचकर, एस.ए. काझी तर सदस्य म्हणून  योगेश श्रीराम बोवलेकर, राहुल आरोलकर,  गुरुप्रसाद गावडे,  अभय येसाजी, एस. डी. राणे,  रोहीदास कामत, नंदु दाभोलकर, अमित नलावडे,  सागर सावंत, एस. व्ही. राऊळ, सत्यवान राऊळ, डी. एस. पालकर, डी. सी. मुठीक, सनगर,  अजित पाटील, अनिल देसाई,  अमित खुर्द, के. एम. अनासुरे आदींचा यामध्ये समावेश आहे.