महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झालेल्या प्रशांत भाईडकरचा सन्मान

ठाकरे गट निरवडेच्यावतीने सत्कार
Edited by: विनायक गावस
Published on: December 06, 2023 12:47 PM
views 162  views

सावंतवाडी : निरवडे गावातील प्रशांत रविंद्र भाईडकर याची महाराष्ट्र सुरक्षा दलमध्ये निवड झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे शिवसेना निरवडेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी उपतालुका प्रमुख संदिप पांढरे शाखाप्रमुख संदिप बाईत तळवडे विभागप्रमुख रोहन मल्हार ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार सौ.रेश्मा पांढरे सौ.प्रगती शेटकर व भाईडकर वाडीतील तथा निरवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.