
सावंतवाडी : महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघ सिंधुदुर्ग विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेश श्रीपाद पनवेलकर यांचा श्री दैवज्ञ गणपती मंदिर कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी गणपती मंडळाचे अध्यक्ष शिवशंकर उर्फ बंड्या नेरुरकर, उपाध्यक्ष राजू कारेकर, सदस्य विराग मडकईकर, अभय मालवणकर, मिलिंद चोणकर, कुमार नेरुरकर, शेखर धारगळकर आदी उपस्थित होते.