
कुडाळ : युवा महाराष्ट्र फाउंडेशन आणि अनुश्री फाउंडेशन यांच्यातर्फे डिगस येथील हिंदूत्वनिष्ठ, सामाजिक, शेती, उद्योग क्षेत्रात अग्रेसर असणारे श्रीकृष्ण सुरेश शिरोडकर यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 नुकताच जाहीर झाला आहे.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. श्री श्रीकृष्ण शिरोडकर यांचा विविध सामाजिक कार्यात सहभाग असतो.विविध राष्ट्र विघातक घटना घटनांच्या विरोधात निवेदन देणे, मोडी लिपीचा प्रचार, विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यात सहभाग, विविध क्षेत्रात कार्यरत हिंदुत्ववाद्यांच्या नियमित संपर्कात राहणे, प्राणी संवर्धन, अभ्यास मंडळ कार्य, गडकिल्ले संवर्धन कार्य, दिव्यांगांसाठी चे कार्य, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे राबवला जाणारा बलिदान मास विविध ठिकाणी आयोजित करणे, दिव्यांगांसाठी आर्टिफिशियल अवयव दान शिबिर, ओंकार हत्तीच्या स्थलांतरा साठीचे प्रयत्न, शेती व व्यवसाय संधीसाठीचे कार्य अशा अनेक विविध कार्यांमध्ये श्रीकृष्ण शिरोडकर यांचा सक्रिय सहभाग असतो.
श्रीकृष्ण शिरोडकर बांधकाम व्यावसायिक आहेत, स्वतःच्या व्यस्त नियोजनामध्ये ते या विविध सामाजिक कार्यात सहभाग देत असतात. आपण करत असलेल्या सामाजिक, अध्यात्मिक कार्याची ही पोचपावती असून अध्यात्मिक सामर्थ्याच्या तपोबलावर आपल्याला विविध कार्यात यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.












