इंजीनियरिंगच शिक्षण मराठीतून देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य : मंत्री दीपक केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 09:32 AM
views 215  views

सावंतवाडी : ५१ व राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच माजगाव धरण व सावंतवाडी नळपाणी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपलं मत व्यक्त केले. 

ते म्हणाले, भारत हा जगातला सर्वात तरूण देश आहे‌. मुलांना शिक्षणानंतर ताबडतोब नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच मत आहे. महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे जे इंजीनियरिंगच शिक्षण मराठीतून देत आहे‌. नव्या  शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिलं आहे. स्वताच्या भाषेत शिक्षण घेणारी मुलं यशस्वी झाली आहेत. आमची मुलं एवढी हुशार आहेत की जगामध्ये ती आपल नाव चमकवू शकतात. मुलांमधील कौशल्याला वाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर असतो. त्यामुळेच शिक्षण खात असे उपक्रम राबवित आहेत. महायुतीच सरकार येत्या काळात शैक्षणिक क्रांती करताना दिसेल. मुलांच चांगल भवितव्य घडविण्याच काम आम्ही करत आहोत. ही मुलं महाराष्ट्राच वैभव आहे‌. प्रयोग करणाऱ्या मुलांमधून देशातील नवं वैज्ञानिक घडणार आहेत‌ असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. मुलांना चांगलं शिक्षण मिळाव म्हणून शिक्षकांच्या अनेक समस्या दुर करण्यात येत आहे. मुलांच्या व्यक्तीमत्व विकासाला प्राधान्य दिलं आहे. सेलिब्रिटी स्कूलची नवी संकल्पना येत्या काळात सुरु होत आहे. मुलांनी कोणत्याही गोष्टीत कमीपणा न बाळगता अनुभव घ्यावा, नेहमी शिक्षण घेत रहावं असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं.

तर जगात केवळ इंग्रजी ही भाषा नाही. जर्मनी, फ्रान्स भाषा देखील तुम्हाला शिकविल्या जातील. त्याच न्याय मुलांना दिलं जाईल असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडीचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटत आहे. माजगाव धरण व नळपाणी योजनेचा शुभारंभ होत आहे‌. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सावंतवाडी वासियांकडून आभार व्यक्त करतो असं केसरकर म्हणाले.