
देवगड : १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन सोहळा देवगड तहसीलदार कार्यालयात देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. सहा. पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव यांनी सलामी दिली. राष्ट्रगीत झाले वर महाराष्ट्र गीत शेठ म.ग.हायस्कुल विदयार्थ्यांनी गायीले. यावेळी देवगड पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, नायब तहसीलदार, श्रीकृष्ण ठाकूर, विवेक शेट, अन्य महसूल कर्मचारी, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.