देवगड तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 02, 2024 09:36 AM
views 261  views

देवगड : १ मे महाराष्ट्र दिन देवगड तहसील कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संकेत यमगर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले .यावेळी देवगड पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांनी सलामी दिली.

या सोहळ्यास निवासी नायब तहसीलदार विवेक शेट ,निवडणूक नायब तहसीलदार व्ही.व्ही .मोरे, सा. बा.उपविभाग देवगडचे उपविभागीय अधिकारी एस. आर. बासुदकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी राऊत देवगड आगार व्यवस्थापक निलेश लाड, पत्रकार दयानंद मांगले अन्य मान्यवर उपस्थित होते .शेठ म ग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, तसेच तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक प्रदीप कदम यांनी देश देशभक्तीपर गीत सादर केले. या निमित्ताने मतदान प्रतिज्ञा घेतली.